पंतप्रधानांच्या हस्ते 19 नोव्हेंबरला मुंबई मेट्रोचं भूमिपूजन

November 16, 2016 9:21 PM0 commentsViews:

modi on dadari16 नोव्हेंबर : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी चालवलीय. 19 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रोचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. मेट्रो – 5 आणि मेट्रो – 6 या प्रकल्पांचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. यानंतर मेट्रोच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. याच दिवशी मुंबईत सोमय्या ग्राऊंडवर नरेंद्र मोदींची जाहीर सभा होणार आहे.

मुंबई मेट्रो – 5
ठाणे – भिवंडी
अंदाजे खर्च 8, 416 कोटी रु.
17 स्टेशन्स
कल्याण एपीएमसी, कल्याण रेल्वे स्टेशन, सहजानंद चौक, दुर्गाडी किल्ला, कोनगाव, गोवेगाव MIDC, राजनौळी, टेमघर, गोपाळनगर, भिवंडी, धामणकर नाका, अंजुर फाटा, पूर्णा, काल्हेर, कशेळी, बाळकुंभ नाका, कापुरबावडी

मुंबई मेट्रो – 6
अंदाजे खर्च 6, 672 कोटी रु.
जोगेश्‍वरी – विक्रोळी
13 स्टेशन्स
लोखंडवाला कॉम्प्लेक्स, आदर्शनगर, मोमीननगर, जेव्हीएलआर, श्यामनगर, महाकाली गुंफा, सीप्झ गाव, साकी विहार रोड, रामबाग, पवई तलाव, आयआयटी पवई, कांजुरमार्ग (प.), विक्रोळी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close