मुंडेंचा ममतांवर ठपका

May 4, 2010 3:44 PM0 commentsViews: 1

4 मे

मुंबईतील मोटरमनच्या संपाला पूर्णपणे ममता बॅनर्जीच जबाबदार आहेत, असा आरोप भाजपचे लोकसभेतील विरोधी पक्ष उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केला.

वेळीच निर्णय घेतला असता तर मुंबईकरांचे हाल टळले असते, असेही त्यांनी म्हटले आहे.

मोटरमन्सच्या संपाचा मुद्दा आज संसदेतही चांगलाच गाजला. सर्वपक्षीय खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे कामकाज तहकूब करण्यात आले होते. खासदारांनी मोटरमनच्या संपाचा तीव्र शब्दांत निषेध केला.

तर सरकारने याप्रकरणी हस्तक्षेप करण्याचे आवाहन मुंबईच्या खासदारांनी केले.

close