सुरेंद्र कोहली दोषी

May 4, 2010 3:51 PM0 commentsViews: 2

4 मे

उत्तर प्रदेशातील निठारी हत्याकांडातील एका प्रकरणात सीबीआय कोर्टाने सुरेंद्र कोहलीला दोषी ठरवले आहे.

आरती नावाच्या 7 वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करून आणि खून केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले आहे.

निठारीत सापडलेल्या 19 महिला आणि मुलांच्या सांगाड्यात आरतीच्याही मृत शरिराचे अवशेष सापडले होते.

कोहलीला उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

रिंपा हलदार हिच्या हत्येप्रकरणी कोहलीला यापूर्वीच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

close