उत्तर भारत भूकंपानं हादरला, दिल्लीसह हरियाणात भूकंपाचे सौम्य धक्के

November 17, 2016 9:16 AM0 commentsViews:

earthquake12

17 नोव्हेंबर :  नवी दिल्ली आणि उत्तर भारत आज (गुरूवारी) सकाळी भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हरियाणातील रेवारी परिसरात भूपृष्ठापासून 10 किमी खोलवर या भूकंपाचे केंद्रस्थान होते.

दिल्लीच्या आजुबाजूच्या परिसरातही नागरिकांना भूकंपाचे धक्के स्पष्टपणे जाणवले.

दरम्यान, आज पहाटे झालेल्या भूकंपामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. याआधीदेखील दिल्ली एनसीआर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवलं होतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close