भारताचे 11 जवान ठार केल्याचा पाकिस्तानचा दावा

November 17, 2016 9:21 AM0 commentsViews:

 indian-army-pti-875

17  नोव्हेंबर :  सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ज्या दिवशी 7 पाकिस्तानी रेंजर्सना कंठस्नान घातल्याची माहिती दिली त्याच दिवशी भारताचे ही 11 जवान ठार करण्यात आले आहे, असा दावा पाकिस्तान लष्कर प्रमुख जनरल राहिल शरिफ यांनी केला आहे.

14 नोंव्हबर रोजी पाकिस्तानकडून सीमेवरील कारवाईला प्रत्युत्तर देत भारताने  7 पाकिस्तानी रेंजर्सना कंठस्नान घातलं होतं.  दरम्यान, याच वेळी पाकिस्ताननेही सडेतोड उत्तर दिल्याचे शरिफ यांनी सांगितलं. यात भारताचे 11 जवान मारले गेले असल्याचे सांगून ज्याप्रमाणे पाकिस्तानने आपले सैनिक मारले गेल्याचे उघड केलं आहे, तसंच भारतानेही त्यांचे सैनिक ठार झाल्याचं उघड करावं, असं आवाहन शरिफ यांनी केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close