झिम्बाव्बेला पुन्हा पावसाचा फटका

May 4, 2010 5:38 PM0 commentsViews: 1

4 मे

टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत सलग दुसर्‍या दिवशीही पावसानं व्यत्यय आणला. झिम्बाव्बेच्या टीमला सलग दुसर्‍या मॅचमध्येही पावसामुळे पराभवाला सामोरं जावं लागलं आणि स्पर्धेतलं त्यांचं आव्हानही संपुष्टात आलं.

न्यूझीलंडबरोबर झालेल्या मॅचमध्ये झिम्बाब्वेनं पहिली बॅटिंग करत केवळ 84 रन्स केले… तायबू आणि मासाकाजा या झिम्बाब्वेच्या ओपनिंग जोडीनं आक्रमक सुरुवात केली… पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 36 रन्सची पार्टनरशिप केली… पण तायबू 21 तर मासाकाजा 20 रन्सवर आऊट झाला… आणि यानंतर इतर बॅट्समनची पॅव्हेलिअनमध्ये परतण्याची स्पर्धाच सुरु झाली…

15व्या ओव्हरमध्येच त्यांची टीम 84 रन्सवर ऑलआऊट झाली… न्यूझीलंडतर्फे नॅथन मॅक्युलम आणि स्कॉट स्टायरिसनं प्रत्येकी 3 विकेट घेतल्या… विजयाचं हे माफक आव्हान समोर ठेऊन खेळणार्‍या न्यूझीलंडची सुरुवातही संथ झाली… 8 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावत न्यूझीलंडनं केवळ 36 रन्स केले…

पण यानंतर पावसाचा खेळ सुरु झाला आणि मॅच थांबवण्यात आली… अखेर डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे न्यूझीलंडला 7 रन्सनं विजयी घोषित करण्यात आलं… ग्रुप बी मध्ये न्यूझीलंडनं सलग दोन विजय मिळवत अव्वल क्रमांक पटकावलाय…

close