छगन भुजबळ यांची जामिनासाठी हायकोर्टात याचिका

November 17, 2016 2:18 PM0 commentsViews:

bhujbal_arrested

17 नोव्हेंबर :   माजी सार्वजनिक बांधकाममंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आता आपल्या अटकेविरोधात एक नवी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. आपल्याला चुकीच्या पद्धतीनं अटक करुन हा खटला चालवला जात आहे, असं भुजबळांनकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत सांगण्यात आलंय. त्याचबरोबर,  प्रकृती अस्वास्थामुळे आपल्याला लवकरात लवकर जामीन देण्यात यावा, अशी मागणी भुजबळांकडून दाखल करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी छगन भुजबळ सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. जामीन मिळावा यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. चुकीच्या पद्धतीने अटक करुन खटला सुरु केल्याचा दावा भुजबळ यांच्यावतीने हायकोर्टात दाखल करण्यात आला. तसंच प्रकृती अस्वस्थामुळे लवकरात लवकर जामीन मिळावा अशी मागणीही भुजबळांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, भुजबळ यांच्या या याचिकेवर येत्या 22 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close