‘हिंदुस्थान टाईम्स’चा दिलासा

May 4, 2010 5:52 PM0 commentsViews: 2

4 मे

रेल्वे मोटारमन्सच्या संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. संध्याकाळी घरी परतणार्‍या मुंबईकरांना तर याचा जबरदस्त फटका बसला.

मुंबईकरांचे हे हाल कमी करण्यासाठी हिंदुस्थान टाईम्स या दैनिकाने आज पुढाकार घेतला. 'मुंबई फर्स्ट' या कॅम्पेनअंतर्गत या एचटीने मुंबईकरांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून दिली.

सीएसटी ते ठाणे, चर्चगेट ते बोरिवली, दादर ते बोरिवली, बीकेसी ते बोरिवली आणि अंधेरी ते दहिसर या मार्गांवर एचटीने ही सेवा दिली.

close