नोटबंदीमुळे Paytm ला सुगीचे दिवस, 435 टक्क्याने वापर वाढला

November 17, 2016 5:08 PM0 commentsViews:

paytm17 नोव्हेंबर : केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे कॅशलेस व्यवहारांबद्दल मोठी चर्चा होतेय. नोटांच्या चणचणीच्या दिवसात सगळ्यांनाच Paytm सारख्या मोबाईल अॅपचं महत्त्व पटलंय. खरंतर टेक्नोसॅव्ही युवा पिढी Paytm सारख्या मोबाईल अॅपचा वापर गेली दोन वर्षं करत आलीय. पण आता खरोखरच खिशात नोटा नसल्यामुळे Paytm चा वापर वाढलाय. भारतभरात Paytm चा वापर 435 टक्क्यांनी वाढलाय, असंही समोर आलंय.

वीजबिल, गॅसचं बिल, विम्याचा हप्ता, डीटीएच कनेक्शन, सिनेमाची तिकिटं यासाठी आता रांगेत राहायची गरज नाही. ऑनलाईन पेमेंटसाठी फार मोठ्या यंत्रणेचीही गरज नाही. तुमच्या हातातल्या मोबाईलवर काही क्लिक्स करून तुम्ही हे पेमेंट करू शकता.

तुमच्या मोबाईलवर इंटरनेटवरून Paytm ऍप डाऊनलोड करता येतं. हे ऍप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये लॉग इन करावं लागतं. Paytm मधून आपण थेट बिल भरू शकतोच. शिवाय आपल्या खात्यातले पैसे Paytm मध्ये टाकून डेबिट कार्डशिवायही तुम्ही खरेदी करू शकता.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर Paytm कंपनीने भारतात पुन्हा एकदा जोरदार जाहिरात मोहीम राबवलीय. भारतभरात Paytm चा वापर 435 टक्क्यांनी वाढलाय, असंही समोर आलंय. कॅशलेस व्यवहारांच्या या काळात Paytm चा वाटा मोठा असणार आहे, हेच यावरून दिसतंय.

भारतीय उद्योजक विजयशेखर शर्मा यांनी Paytm या कंपनीची सुरुवात केली. आता Paytm ची उलाढाल 5 अब्ज डॉलर्सच्याही पुढे गेलीय.

 असं करा Paytm

- तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअरवरून Paytm ऍप डाऊनलोड करा

- हे ऍप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये आधी अकाऊंट तयार करा

- मोबाईल रिचार्ज, वीजबिल, गॅस बिल, डीटीएच कनेक्शन, विम्याचा हप्ता हे सगळं तुम्ही Paytm ने भरू शकता.

- रेल्वे, बस, सिनेमाचं तिकीट आणि कपड्यांची खरेदीही Paytm वर होऊ शकते.

- हे पेमेंट तुम्ही ऑनलाईन आणि डेबिट- क्रेडिट कार्डने करू शकता.

- आपल्या खात्यातले पैसे Paytm मध्ये टाकून आपण डेबिट-क्रेडिट कार्डशिवायही खरेदी करू शकतो.

- आपल्या Paytm खात्यातून दुस-याच्या Paytm खात्यात पैसे ट्रान्स्फर करू शकतो.

- Paytm खात्यातून दुस-याच्या बँक खात्यातही पैसे ट्रान्स्फर करू शकतो.
 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close