मोटरमनकडून भरपाई घ्या

May 5, 2010 8:54 AM0 commentsViews: 6

5 मे

संपादरम्यान प्रवाशांच्या झालेल्या नुकसानीची मोटरमनकडून भरपाई वसूल करा, असे मुंबई हायकोर्टाने केंद्रसरकारला सुचवले आहे.

अधिकृत पासधारकांना ही भरपाई दिली जावी, असे मत कोर्टाने व्यक्त केले आहे.

या संदर्भात ऍडव्होकेट सुरेशकुमार यांनी जनहित याचिका दाखल केली होती. पासधारकांची भरपाई रेल्वे संपकरी मोटरमेनकडून वसूल करू शकतात, असे कोर्टाने म्हटले आहे.

आता केंद्र सरकार याला 16 जूनपर्यंत कोर्टात उत्तर देणार आहे. न्यायाधीश जे. एन. पटेल यांनी हा निर्णय दिला आहे.

close