जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांचा घोळ कायम

October 18, 2008 5:09 PM0 commentsViews: 8

18 ऑक्टोबर, जम्मू-काश्मीरपाच राज्यांमधल्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या पण जम्मू काश्मीरच्या तारखांचा घोळ अजूनही कायम आहे. या मुद्यावरुन राजकीय पक्षांपेक्षा निवडणूक आयोगातच दोन तट पडले आहेत. जम्मू-काश्मीरच्या निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी आयोगाला 4000 उर्दू बोलणाया अधिकार्‍यांचा फौजफाटा पुरवण्याची सरकारनं तयारी दाखवली आहे. पण तारखांचा वाद अद्याप मिटलेला नाही. निवडणूक आयोगाच्या तिन्ही सदस्यांमध्ये याबाबत एकमत नाही. पण तारखांच्या मुद्यावरून आयोगातच मतभेद आहेत, हे आयोगानं साफ फेटाळून लावलं आहे.

close