शिवाजी पार्क सायलेन्स झोन

May 5, 2010 9:27 AM0 commentsViews: 9

5 मे

शिवाजी पार्कला सायलेन्स झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. मुंबई हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे.

यासंदर्भात अशोक रावते या स्थानिक रहिवाशाने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज हा निर्णय देण्यात आला.

या निर्णयानुसार महाराष्ट्रदिन, प्रजासत्ताक दिन आणि महापरिनिर्वाणदिनीच शिवाजी पार्कच्या ग्राऊंडवर लाऊडस्पिकरला परवानगी देण्यात आली आहे.

त्यामुळे आता राजकीय पक्षांना लाऊडस्पिकरविना इथे सभा घ्यावी लागणार आहे.

प्रतिज्ञापत्र सादर करणार

शाळा, हॉस्पिटल या परिसरात सायलेन्स झोन जाहीर करता येतो. पण शिवाजी पार्क हे क्रीडा मैदान आहे. त्यामुळे त्याला दिलेला सायलेन्स झोनचा दर्जा वगळावा यासाठी महापालिका प्रशासनाकडून कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल, असे महापौर श्रद्धा जाधव यांनी म्हटले आहे.

close