एटीएममधून पैसे मिळाले नाही म्हणून दोघांची आत्महत्या ?

November 17, 2016 9:20 PM0 commentsViews:

suside18 नोव्हेंबर : एटीएमच्या रांगेत उभं राहूनही पैसे न मिळाल्यानं औरंगाबादमध्ये दोघांनी आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबीयांनी केलाय. गेल्या अनेक दिवसांपासून एटीएम आणि बँकेत रांगेत थांबूनही पैसे मिळत नाही. या निराशेमुळे महंमद शकील यांनी भाचा अब्दुल नाफे याच्यासोबत आत्महत्या केलीय.

हर्सूल तलावामध्ये या दोघांचे मृतदेह काल संध्याकाळी सापडले. महंमद शकील यांच्या खिशात रेशनची यादी, लाईट बिल आणि औषधाची चिठ्ठी सापडली आहे. शकील यांना तीन महिन्यापूर्वीच लहान बाळ झालंय. बाळाच्या औषधासाठी पैसे मिळत नव्हते असा दावा त्याचा मेव्हणा अझिम यांनी केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close