रजनीकांत-अक्षयकुमारच्या ‘2.0’चं पोस्टर रिलीज

November 17, 2016 9:45 PM0 commentsViews:

18 नोव्हेंबर : सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. अक्षयने फोटोसहीत असे पोस्ट केले आहे कि,’फक्त चार दिवसांची प्रतिक्षा , 20 नोव्हेंंबरला चित्रपटाची मजा घेऊ शकता.’

चित्रपटाचा फर्स्ट लुकच्या लॉँचसाठी निर्मात्यांकडून मोठ्या इव्हेंटचे प्लॅनिंग सुरू आहे. हा इव्हेंट येत्या शनिवारी मुंबईत संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. यात अक्षय व्हिलनचा रोल करतोय.हा बिग बजेट चित्रपट असून त्याच्या निर्मितीला 350 कोटींचा खर्च केला गेला.2010 ला आलेल्या ‘रोबोट’ ह्या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close