वाळू ठेकेदार खून प्रकरणी चौघांना अटक

May 5, 2010 9:38 AM0 commentsViews: 14

5 मे

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात वाळूमाफीयांनी शरद चौधरी या वाळू ठेकेदाराचा तलवारीचे वार करून खून केला होता. या प्रकरणातील चार आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

विकास रसाळ, पिंट्या रसाळ, नंदू खेडकर आणि भुजंग बाकरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पुणे जिल्ह्यात कुकडी, घोडनदी, भीमा नदी परिसरात वाळूमाफीयांची दहशत पसरली आहे. विशेषत: दौंड, शिरूर तालुक्यात वाळू माफीयांच्या कारवाया सुरू आहेत.

याला आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आता नदीकाठी सामूहिक गस्त घालण्याचा मार्ग अवलंबणार आहेत.

यात होड्या भाड्याने घेऊन पोलीस, आरटीओ आणि महसूल विभागाचे कर्मचारी मिळून गस्त घालणार आहेत. पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक प्रताप दिघावकर यांनी ही माहिती दिली.

close