नोटबंदीला 78 टक्के लोकांचा पाठिंबा, त्रास सहन करण्याचीही तयारी

November 17, 2016 10:44 PM0 commentsViews:

palika_money

17 नोव्हेंबर : नोटबंदीमुळे देशभरात हाहाकार उडाला आहे. विरोधकांनी नोटबंदी मागे घेण्याचा इशारा दिलाय. तर नागरिकांनीही होणा-या गैरसोईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलीये. याचा धागा पकडून लोकल सर्कल्सनं एक सर्व्हे केलाय. त्यात मोदी सरकारच्या निर्णयाला 78 टक्के लोकांनी पाठिंबा दिला आहे.

तर थोडा त्रास सहन करण्याची तयारी लोकांनी दाखवली आहे. यात महाराष्ट्रातल्या लोकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून 70 ते 80 टक्के लोकांनी नोटबंदीला पाठिंबा दिला आहे. तर गुजरात,आंध्रप्रदेश आणि केरळने सर्वाधिक 80 टक्के पाठिंबा दिलाय.

नोटबंदीवर आपलं मत काय आहे?
8 नोव्हेंबर 2016

पूर्ण पाठिंबा – 78%
पाठिंबा नाही – 15%
माहीत नाही – 7%
किती लोकांचा सर्व्हे केला? – 10,998

नोटबंदीवर आपलं मत काय आहे?

79% – पाठिंबा, थोडा त्रास सहन करू
18% – पाठिंबा, पण त्रास खूप आहे
2% – चुकीचा निर्णय, समर्थन नाही
1% – चांगला निर्णय
किती लोकांचा सर्व्हे केला – 10,913

15 नोव्हेंबर 2016

कोणत्या राज्यात किती समर्थन?
80%पेक्षा जास्त

गुजरात
आंध्रप्रदेश
केरळ

कोणत्या राज्यात किती समर्थन?

70 ते 80% टक्के
महाराष्ट्र
कर्नाटक
उत्तर प्रदेश
पश्चिम बंगाल
राजस्थान
तेलंगणा
तामिळनाडू

कोणत्या राज्यात किती समर्थन?

50 ते 70 टक्के पाठिंबा

उडिशा
उत्तराखंड
दिल्ली
हरियाणा
मध्य प्रदेश


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close