आता नर्सेसचा संप

May 5, 2010 10:54 AM0 commentsViews: 1

5 मे

लोकल ट्रेनच्या मोटरमनचा संप मिटला असला तरी आज मुंबईत दुसरा एक संप सुरू झाला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 20 हॉस्पिटल्सच्या नर्सेस संपावर गेल्या आहेत.

या नर्सेसनी एक दिवसाचे सामुदायिक रजा आंदोलन पुकारले आहे. आझाद मैदानावर या नर्सेस आंदोलन करत आहेत.

सहाव्या वेतन आयोगामध्ये नर्सेसना चतुर्थ श्रेणी देण्यात आली आहे. या निर्णयाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे.

आज दुपारी महापौरांनी यासंदर्भात एक बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर नर्सेसच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे.

close