आता पेट्रोल पंपावरही काढता येणार पैसे, सर्वसामान्यांना दिलासा

November 18, 2016 9:05 AM0 commentsViews:

petrol_price_hike

18 नोव्हेंबर :  नोटबंदीच्या निर्णयानंतर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी केंद्रातर्फे वेगवेगळे प्रयत्न केले जातायत. याच प्रयत्नांतर्गत देशभरातील काही निवडक पेट्रोल पंपांवर पैसे काढण्याची सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. बँक आणि एटीएमच्या रांगेत तासनतास ताटकळणाऱ्या नागरीकांसाठी आजपासून पेट्रोल पंपावर कॅश काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

सरकारी तेल कंपन्यांच्या पेट्रोल पंपावर नागरीक त्यांच्या डेबिड कार्डचा वापर करुन 2 हजार रुपयांपर्यंत कॅश काढू शकतात. सुरुवातीला निवडक अडीचहजार पेट्रोलपंपावर ही सुविधा मिळणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे कार्ड स्वाइप मशिन असलेल्या पेट्रोल पंपावरुन पैसे काढता येतील. लवकरच एचडीएफसी, सिटी बँक आणि आयसीआयसीआय बँकेचे कार्ड स्वाइप मशिन असलेल्या आणखी २० हजार केंद्रांवर ही सुविधा सुरू करण्यात येईल. नव्या नोटांसाठी बँका आणि एटीएम केंद्राबाहेर लागणाऱ्या रांगा कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपायोजना करण्यात येत आहेत.

याच प्रयत्नात साथ देण्याच्या हेतूने ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्स असोशिएशनने ही कल्पना मांडली. नागरीकांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं असलं तरी यामुळे पेट्रोल पंपावरील गर्दी वाढण्याचीही भिती आहे. पेट्रोल पंपावरुन कॅश काढण्याचीही सुविधा २४ नोव्हेंबरनंतरही सुरू रहाणार आहे. अत्यावश्यक सेवांसाठी 500 आणि 1 हजार रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्याची 24 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close