भिवंडीत चारमजली इमारत कोसळल्यानं एकाचा मृत्यू

November 18, 2016 9:01 AM0 commentsViews:

Bhiwandi123

18 नोव्हेंबर :  भिवंडीत काल (गुरुवारी) मध्यरात्री  चारमजली इमारत कोसळल्यानं एकाचा मृत्यू झाला आहे. या इमारतीचा काही भाग शेजारील इमारतीवर पडल्यानं त्यातील 20 कुटुंबांनाही घर सोडायला लावलं आहे.

भिवंडीतल्या गोकुळ नगर भागातील समता सोसायटीमधील सूर्यराव ही 40 वर्ष जुनी इमारत कोसळली.  गुरुवारी रात्री उशीरा ही इमारत कोसळली. या दुर्घटनेत एक जण ढिगाऱ्याखाली अडकला होता.

अग्निशमन दलानं ढिगारा उपसून एक मृतदेह बाहेर काढला. पालिका प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत.

भिवंडीत पावसाळ्यादरम्यानही इमारत कोसळण्याच्या तीन घटना घडल्या होत्या. या घटनांमध्ये जीवितहानीचे प्रमाणही जास्त होते. दरम्यान, सूर्यराव इमारत कोसळल्याने भिवंडीसह ठाणे जिल्ह्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close