बोटांवर शाई लावण्याच्या निर्णयावर निवडणूक आयोगाचा आक्षेप

November 18, 2016 12:28 PM0 commentsViews:

Banks

18 नोव्हेंबर : नोटा बदलण्यासाठी तेच तेच लोक वारंवार येत असल्याने त्यांच्या बोटांवर शाई लावण्याचा जो निर्णय सरकारने घेतला, या निर्णयावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला. बोटांवर लावली जाणारी शाई बँकांमध्ये वापरु नका, असं निवडणूक आयोगाने केंद्रीय अर्थमंत्रायाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर नोटा बदलण्यासाठी, पैसे काढण्यासाठी आणि पैसे जमा करण्यासाठी बँकांमध्ये रांगा लागत आहेत. त्यामुळे ही गर्दी कमी करण्यासाठी पैसे बदलणाऱया व्यक्तीच्या बोटावर शाई लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्णयावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेत मतदानाची शाई बँकेत वापरु नका, असं सांगितलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close