नार्को चाचणी घटनाबाह्य

May 5, 2010 11:17 AM0 commentsViews: 4

5 मे

संशयीत गुन्हेगाराकडून सत्य वदवून घेण्यासाठी केली जाणारी नार्को टेस्ट घटनाबाह्य असल्याचा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

नार्को चाचणीमुळे मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे, असे सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात नमूद केले आहे. त्याच वेळी ज्यांची नार्को टेस्ट करायची आहे, त्यांची परवानगी घेणे हे कोर्टाने बंधनकारक ठरवले आहे.

कोणत्याही व्यक्तीची नार्को चाचणी करणे हे घटनाबाह्य असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. कारण अशा प्रकारे चाचणी करून माहिती मिळवणे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा भंग असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग किंवा पॉलिग्राफ टेस्टची कोणत्याही व्यक्तीवर सक्ती करता येणार नसल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

मुख्य न्यायाधीश के. जी. बालकृष्णन, न्यायमूर्ती जे. एम. पांचाल आणि बी. एस. चौहान यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

close