जिल्हा बँकांवरची नोटबंदी 20 दिवसांनी उठवली जाऊ शकते -शरद पवार

November 18, 2016 6:16 PM0 commentsViews:

pawar_on_droght18 नोव्हेंबर : जिल्हा बँकांवरची नोटबंदी 20 दिवसांनी उठवली जाण्याची शक्यता आहे तसं आश्वासन अर्थमंत्री अरुण जेटलींनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना दिलंय. शरद पवारांनी आज जेटलींची भेट घेतली. या भेटीत जेटलींनी हे आश्वासन दिलं, अशी माहिती पवारांनी आयबीएन लोकमतला दिली.

नोटबदलीचा निर्णय जाहीर झाल्यावर केंद्र सरकारनं जिल्हा बँकांना नोटबदलीची परवानगी दिली नाही. याची कारणं जरी आर्थिक असली, तरी त्याचा फटका शेतक-यांना बसलाय. कारण ग्रामीण भागात अनेक शेतक-यांची खाती सहकारी बँकांमध्ये आहेत, आणि त्यात भर म्हणजे गावाकडे राष्ट्रीयकृत किंवा खासगी बँकांच्या तेवढ्या शाखाही नाहीयेत. तसंच रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांना नोट स्वीकारण्यास मनाई केलीये. त्यामुळेच आज शरद पवारांनी भेट घेऊन सहकार कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close