लवकरच बँकेतून नोटाबदलीवर बंदी ?

November 18, 2016 6:51 PM0 commentsViews:

500_note_Baned18 नोव्हेंबर : नोटाबदलीच्या संदर्भात 22 किंवा 23 तारखेला एक महत्त्वाचा निर्णय येऊ शकतो. नोटाबदलीमध्ये गडबड होत असल्यामुळे 24 नोव्हेंबरपासून बँकेत नोट बदलण्यावर बंदी येऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिलीये. त्यामुळे 24 नोव्हेंबरपासून फक्त बँकेत तुम्ही 500 आणि 1000 च्या नोटा डिपॉझिट करता येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला 500 आणि 1000 च्या नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून बँकेत नोट बदली आणि डिपॉझिट करण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आलीये. पण, नोट बदली करण्यासाठी लोकांनी बँकांत मोठी गर्दी केलीये. लोकं एकाहुन अधिक बँकातून पैसे बदलून घेत असल्याचं समोर आलंय. काळा पैशाला लगाम घालण्यासाठी सरकारने उचललेल्या मोहिमेला यामुळे खिळ बसत आहे. त्यामुळेच आता नोटाबदलीवर बंदी आणण्याची शक्यता आहे. अलीकडेच नोटा बदली करण्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या बोटाला शाई लावण्याचा प्रयोग सुरू झालाय. त्यानंतर आता हा नोटाबदलीच बंद करण्याचा सरकारचा विचार आहे.

नव्या नोटा फक्त एटीएममधून काढता येतील आणि बँकांमध्ये पैसे जमा करता येतील. तसंच बँकांवरचा ताण कमी करणे आणि एटीएममध्ये सुरळीतपणे पैसे यायला लागले आहेत, त्याचा फायदा घेणे हे यामागचा हेतू आहेत. पण अजून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close