बँकेतून उद्या नोटा बदलून मिळणार नाहीत !

November 18, 2016 9:07 PM0 commentsViews:

bank_news3318 नोव्हेंबर : नोटबंदीनंतर देशभरात बँकामध्ये झुंबड उडाली आहे. लोकांसह बँक कर्मचा-यांवरही याचा ताण पडलाय. म्हणूनच उद्या बँकांमध्ये नोटा बदलून मिळणार नाहीत,असं इंडियन बँक असोसिएशनने जाहीर केलंय. ज्येष्ठ नागरिकांना पैसे बदलून घेण्यासाठी मुभा देण्यात आलीये. तरी असं असलं तरी बँकेत पैसे भरता येतील आणि पैसे काढताही येतील. उद्या शनिवार असला तरी पूर्ण दिवस बँक सुरूच राहणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला 500 आणि 1000 च्या नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर बँकांमध्ये 500 आणि 1000 च्या नोटा बदलून आणि पैसे भरण्यासाठी एकच गर्दी उसळली. बँकाबाहेर रांगाच रांगा लागल्या आहेत. त्या अजूनही कायम आहे. शनिवार-रविवार बँका सुरू राहिल्यानंतर सोमवारीच बँक कर्मचा-यांना सुट्टी मिळाली. उद्या शनिवारी बँका सुरू राहणार आहे पण कामातून थोडी उसंत हवीये म्हणून उद्या नोटा बदली करून मिळणार नाही अशी घोषणा इंडियन बँक असोसिएशनने केलाय. नोटबंदीचा निर्णय जाहीर झाल्यापासून बँक कर्मचारी अथक काम करतायत. त्यामुळे या निर्णय घेण्यात आलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close