गोटेंच्या समर्थनासाठी धुळे बंद

May 5, 2010 11:30 AM0 commentsViews: 1

5 मे

आमदार अनिल गोटे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज धुळेकरांनी बंद पाळला आहे.

धुळ्यातील 80 टक्के दुकाने आणि व्यवहार बंद आहेत. गोटेंनी धुळ्यात सफारी पार्कचे काम सुरू केले आहे.

सरकारी जागेत सुरू असलेल्या या बांधकामासाठी परवानगी काढली नसल्याचे महसूल विभागाचे म्हणणे आहे.

त्यामुळे प्रांताधिकार्‍यांनी गोटेंच्या किसान ट्रस्टविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात येत आहे.

close