सुभाष देशमुख मंत्रिपदी असेपर्यंत निष्पक्षपणे चौकशी होऊ शकत नाही -मुंडे

November 19, 2016 3:04 PM0 commentsViews:

dhanjay_munde319 नोव्हेंबर : लोकमंगलच्या पैशांची चौकशी सुभाष देशमुख मंत्रिपदी असेपर्यंत चौकशी निष्पक्षपणे होऊ शकत नाही असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केलाय.

सुभाष देशमुख हे स्वतः सहकारमंत्री आहेत. आणि उमरगा इथं जप्त करण्यात आलेल्या पैशांची चौकशी सहकार विभागाच्या उपनिबंधकाकडून सुरू आहे. त्यामुळे ती निष्पक्षपातीपणे होऊच शकत नाही असं मुंडेंनी ठणकावून सांगितलं.

नगर पालिका निवडणुकामध्ये भाजपचाच काळा पैसेबाहेर येतोय. याप्रकरणी निवडणूक आयोगाने चौकशी करावी अशी मागणी आपण करणार असल्याचंही मुंडे यांनी स्पष्ट केलंय. कळंबमध्ये नगरपालिका निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे मत व्यक्त केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close