नोटाबंदीबाबत देशभक्ती शब्द वापरणं म्हणजे कॉमेडी शो, सेनेनं मोदी समर्थकांना फटकारलं

November 19, 2016 3:12 PM0 commentsViews:

samana_32319 नोव्हेंबर : नोटाबंदीसंदर्भात देशभक्ती शब्द वापरणं हा कॉमेडी शो असल्याची टीका शिवसेनेनं सामनातून मोदी भक्तांवर केलीये. तसंच नोटबंदीच्या निर्णयानंतर मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना सरकारी मदत जाहीर करण्याची मागणीही या सेनेनं केलीय.

आज सेनेचं मुखपत्र सामनातून पुन्हा एकदा नोटाबंदीवरुन भाजपवर तोफ डागण्यात आलीये. नोटाबंदीचे दूरगामी दुष्परिणाम असेच घडणार आहेत. त्यामुळे महागाई, मंदी, बेरोजगारीने चाळीसचे चाळीस लाख झाले तरी सरकार म्हणेल हे देशभक्तीचे बळी आहेत. अशाने एक दिवस सा-या देशालाच ‘शहीद’ घोषित करण्याची वेळ येऊ नये.नोटाबंदीचा बेफाम निर्णय घेतल्यापासून शब्दकोशातील काही शब्दांचे अर्थ आणि व्याख्या बदलल्या गेल्या आहेत. शूर, वीर, देशभक्त अशा संवेदनशील शब्दांची व्याख्या बदलण्याची धडपड ज्या पद्धतीने सुरू आहे तो सर्व म्हणजे कॉमेडी शोचा प्रकार म्हणावा लागेल असा टोला मोदी भक्तांना लगावण्यात आलाय.

तसंच नोटाबंदीच्या रांगेत बडे आणि त्यांचे नातेवाईक नाहीत. फक्त सामान्यच युद्ध करताना दिसतायत. त्यामुळेच या रांगेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना किमान पन्नास लाखांची मदत सरकारने जाहीरच करावी अशी भूमिका मांडण्यात आलीये. याशिवाय त्यांना सुवर्णपट देऊन त्यांना तहहयात पेन्शनही देण्यात यावं असंही सांगण्यात आलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close