पुण्यात मेट्रो जागृती अभियान

May 5, 2010 11:50 AM0 commentsViews: 3

5 मे

पुण्यात होत असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पात पारदर्शकता यावी, नागरिकांना ,तज्ज्ञांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प राबवण्यात यावा यासाठी विविध संघटनांनी मेट्रो जागृती अभियान सुरू केले आहे.

या अभियानाचा भाग म्हणून रविवारी संध्याकाळी डेक्कन जिमखान्यावरील गरवारे भुयारी मार्गापासून जंगली महाराज रोडवरील इंजीनिअरिंग कॉलेज ग्राऊंडपर्यंत एका रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या रॅलीमध्ये स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले. यावेळी बॅनर्स झळकावण्यात आले, घोषणा देण्यात आल्या.

मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अहवालाचा स्वतंत्र समिती नेमून अभ्यास करावा, समितीमध्ये स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात यावा, बीआरटी प्रकल्पाप्रमाणे मेट्रो प्रकल्पाचा बोजवारा उडू नये म्हणून घाईने प्रकल्प राबवू नये, एलिवेटेड ऐवजी भुयारी रेल्वे असावी या प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.

close