दानवेंनी ‘लोकमंगल’ प्रकरणी केली सुभाष देशमुखांची पाठराखण

November 19, 2016 8:18 PM0 commentsViews:

danve34219 नोव्हेंबर : लोकमंगल मल्टिस्टेट बँक प्रकरणी अडचणीत आलेले सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पाठराखण केलीये. देशमुखांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही आणि चौकशीअंती सत्य बाहेर येईल असं दानवेंनी स्पष्ट केलं.

सहकार मंत्री सुभाष देशमुख तसं बोललेच नाहीत, देशमुख यांचं वक्तव्यचा विपर्यास केला गेला आणि वक्तव्य मोडून तोडून दाखवलं गेलं असं म्हणत या प्रकरणाच खापर मीडियावर फोडलं आहे. नोटाबंदी असतानाही मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल बँकेने 91 लाख 50 हजार तब्बल 8 दिवस ठेवले होते. ते गाडीतून नेत असताना निवडणूक आयोगाने पकडले होते. त्यानंतर स्वतः सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी काल प्रसारमाध्यमसमोर बोलताना या संपूर्ण प्रकरणात लोकमंगलकडून अनियमितता झाली असल्याचे कबूल करीत अनियमिततेच्या बाबतीत शासन भोगायला तयार आहे असे वक्तव्य केले होते .या वक्तव्यानंतर विरोधकांनी देशमुख यांनी राजीनामा देण्याची मागणी केली होती, देशमुख यांच्यावर कारवाई करण्याऐवजी प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी सुभाष देशमुख यांची पाठराखण करीत देशमुख अनियमितता असं बोललेच नाहीत असं वक्तव्य केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close