LIVE : कानपूर रेल्वे अपघाताली मृतांचा आकडा 143 वर

November 21, 2016 8:36 AM0 commentsViews:

KANPUR TRAIN DERAILMENT

21 नोव्हेंबर :  उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ पाटणा-इंदूर एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरून घसरल्याची घटना काल (रविवारी) पहाटे घडली. या भीषण अपघातात 133 प्रवासी ठार, तर 200 हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

कानपूरजवळच्या पुखराया इथं आज पहाटे साडेतीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातग्रस्त गाडी इंदूरहून पाटण्याच्या दिशेनं निघाली होती. घटनास्थळी वैद्यकीय पथकं तातडीनं रवाना करण्यात आली असून मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना मदत आणि बचाव कार्यावर बारकाईनं लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळं झाला याची अधिकृत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. तरीही पुखराया रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे रुळ उखडल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून चौकशीचे आदेश दिले आहेत. मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून अपघाताला जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं ट्विट प्रभू यांनी केलं आहे.

दरम्यान, या घटनेनंतर दुःख व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close