सिंधुदुर्गात मायनिंग प्रकल्पांची पाहणी सुरू

May 5, 2010 1:31 PM0 commentsViews: 4

5 मे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर मायनिंगबाबत पाहणी करण्यासाठी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या भोपाळ येथील कार्यालयाचे अधिकारी प्रदीप वासुदेवा हे सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत.

बेकायदा मायनिंग उत्खननाबाबत गावकरी आणि सामाजिक संस्थांनी पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन ही पाहणी करण्यात येत आहे.

त्यानुसार सिंधुदुर्गातील कुंब्रल, कळणे, गाळेल, पडवेमाजगाव, धाकोरे या गावात झालेल्या बेकायदा मायनिंग उत्खननाची पाहणी गावकर्‍यांना सोबत घेऊन करण्यात येत आहे.

या पाहणीनंतर जिल्हा वनाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेऊन हा अहवाल पर्यावरण मंत्रालयाला सादर करण्यात येणार आहे.

close