बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूला चायना ओपनचं जेतेपद

November 20, 2016 3:48 PM0 commentsViews:

PV SINDHI12

20 नोव्हेंबर : रिओ ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत भारताला सिलव्हर मेडल जिंकून देणाऱ्या पी व्ही सिंधूनं पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचात मानाता तुरा रोवला आहे.  सिंघूने आज (रविवारी) चायना ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. चीनच्या सून यूचा 21-11, 17-21, 21-11 असा पराभव केलाय.

चायना ओपन सुपर सिरीजमध्ये भारताची सायना नेहवाल जरी हरली असली तरी पी. व्ही. सिंधूने विजयी घोडदोड कायम ठेवत भारताचे आव्हान कायम ठेवले होते. सिंधूने सेमिफायनल मध्ये कोरियाच्या जी ह्य़ून संगवर 11-21, 23-11, 21-19 असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.

रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक पटकावणाऱ्या सिंधूला गेल्या दोन स्पर्धांत दुसऱ्या फेरीतच पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे या स्पर्धेतील जेतेपद सिंधूचं आत्माविश्वास वाढवणारा ठरेलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


 

close