रत्नागिरीत भाजपचा जुन्या नोटा खपवण्यासाठी जंगी सभांचा बेत

November 20, 2016 8:16 PM0 commentsViews:

adasdady

20 नोव्हेंबर : काळापैशांविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रणशिंग फुंकलं असताना रत्नागिरीतील कार्यकर्ते तरी या मोहिमेत सहभागी झालेले दिसत नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात होणार्‍या भाजपच्या सभांचा खर्च जुन्या नोटांनी केला जातोय. जो कंत्राटदार जुन्या नोटा घेईल त्यालाच सभेच्या मंडप उभारणीचा आणि सभेशी संबधित कामांचं कंत्राट दिलं जातंय.

 रत्नागिरी जिल्ह्यात सध्या नगर परिषद निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. त्यासाठी भाजपच्या बड्या नेत्यांच्या सभा देखील आयोजित करण्यात आल्या आहे. सभेच्या ठिकाणी मोठमोठ्या स्क्रिन उभारण्यात आले आहेत. एवढचं नाही तर या सभा युट्युबवर लाईव्ह आणि काही स्थानिक वाहिन्यांवप लाईव्ह दाखवल्या जाणार आहे. तर अशा हायटेक सभां  होणार  होणारा खर्च हा काळ्या पैशांनी तर होत नाही ना अशी चर्चा रत्नागिरीत सुरु झालीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close