नोटाबंदीला विरोध करणारे देश विरोधकी – मुख्यमंत्री

November 20, 2016 8:56 PM0 commentsViews:

fadnavis sot

20 नोव्हेंबर : नोटाबंदीच्या निर्णयामुळे एकीकडे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली असतानाच, सीमेवर सैनिक लढू शकतो, तर देशातील जनता 50 दिवस त्रास सहन करु शकत नाही का, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नोटाबंदीला विरोध करणारे देशाचे विरोधक असल्याचा वादग्रस्त वक्तव्यदेवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

ते रत्नागिरी नगरपरिषद निवडणूकी निमित्त आयोजित प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या प्रचारसभेत फडणवीस यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. या सभेत मुख्यमंत्री म्हणाले, नोटाबंदीला पाठिंबा देणारे आर्थिक स्वातंत्र्याचे स्वातंत्र्यसैनिक असतील, तर विरोध करणारे देशाचे विरोधी आहेत.

नोटा बदूल घेण्यासाठी बँकेच्या रांगेत उभं राहणाऱ्या सर्वसामान्यांना फडणवीसांनी सैन्याच्या जवानांचा दाखला दिला. पाकिस्तानशी कोणतंही वैयक्तिक शत्रुत्व नसताना सैनिक सीमेवर लढतात, मग तुम्ही देशासाठी 50 दिवस त्रास का सहन करु शकत नाही का, असा उलट प्रश्नच त्यांनी उपस्थित केला आहे.

नोटाबंदीला विरोध करणाऱ्यांना थेट देश विराधी ठरवणाऱ्या मुख्यमंत्र्यांचं विधान वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हं आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


 

close