सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, एक जवान शहीद

November 21, 2016 9:14 AM0 commentsViews:

indian-army_650_100214042800

20 नोव्हेंबर : जम्मू काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असून यात गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला आहे. तर आणखी 3 जवान जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रविवारी रात्रीपासून राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून भारतीय चौक्यांवर गोळीबार सुरु होता. पाकिस्तानच्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे चार जवान जखमी झाले होते.यातील हेड कॉन्स्टेबल राय सिंह यांचा सोमवारी सकाळी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गेल्या 24 तासात पाकिस्ताननं 3 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. भारतीय सैन्याकडूनही पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर देण्यात आलं आहे.

दरम्यान पाकिस्तानकडून काश्मीरच्या नौशेरा आणि सुंदरबनी भागात शनिवारपासून गोळीबार सुरु आहे. यात बीएसएफचा एक जवान जखमी झाला होता. उखळी तोफांमुळे सीमा रेषेवरील घरांनाही फटका बसला. या घटनेत एक महिलादेखील जखमी झाले होती.

तर गेल्या आठवड्यात पाकिस्ताननं जम्मूच्या पल्लनवाला सेक्टरमध्ये सीमेलगतच्या गावांना लक्ष्य केलं होतं. भारताने 29 सप्टेंबररोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यापासून पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. सीमा रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबाराच्या 286 घटना घडल्या आहेत. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात आत्तापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला असून यात 14 जवानांचा समावेश आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close