विशाखापट्टणम कसोटीत टीम इंडियाचा दणदणीत विजय

November 21, 2016 2:14 PM0 commentsViews:

Test matchw213

21 नोव्हेंबर : इंग्लंडविरोधातील कसोटी मालिका विजयाचा दुष्काळ संपवण्याच्या दिशेने भारताने दमदार पाऊल टाकलं आहे. विशाखापट्टणम् कसोटीत भारताने इंग्लंडवर 246 रन्सनी दणदणीत विजय मिळवला असून पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. दरम्यान, पहिल्या डावात 167  रन्स आणि दुसऱ्या डावात 81 रन्स करणारा कॅप्टन विराट कोहली मॅन आॅफ द मॅच ठरला आहे.

भारताने दिलेल्या 405 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने 2 बाद 87 धावा केल्या होत्या.  अश्विन आणि जयंत यादव यांनी दुसऱ्या डावात प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद शमी आणि जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या.

सोमवारी पाचव्या आणि अखेरच्या दिवसाचा खेळ सुरु होताच भारताच्या फिरकीपटूसमोर इंग्लंडची भंबेरी उडाली. टीम इंडियाने पहिल्या सत्रात 5 विकेट्स मिळवून विजयाच्या दिशेने कूच केली. त्यानंतर इंग्लंडची अवस्था 7 बाद 142 रन्स अशी होती. त्यानंतर दुसऱया सत्राची सुरूवात होताच अश्विन आणि जयंत यादव यांनी आपल्या अफलातून फिरकीवर इंग्लंडच्या उर्वरित तीन फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडून टीमला विजय मिळवून दिला. श्विन आणि जयंत यादव यांनी दुसऱया डावात प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद शमी आणि जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close