सलमानचं लुलियासोबत झालं ब्रेकअप

November 21, 2016 3:46 PM0 commentsViews:

luliamain

21 नोव्हेंबर: सध्या चर्चा आहे ती सलमान खान आणि लुलिया यांच्या ब्रेकअपची. काही दिवसांपासून त्यांचं अफेअर आणि नंतर लग्नाच्या बातम्या येत होत्या. पण आता दोघांचं ब्रेकअप झाल्याचं कळतंय.

लुलिया तिचा भारतातला विझा संपल्यामुळे परत रुमानियाला गेली आणि अजून तरी परतली नाहीय. लुलियानं रुमानियाच्या एका मासिकाला मुलाखत दिली. त्यात तिनं म्हटलंय की, ‘भारताची संस्कृती पूर्ण वेगळी आहे.इथल्या लोकांची मानसिकताही वेगळी आहे. भारतात जास्त प्रायव्हसी मिळत नाही. एका घरात खूप लोक राहतात.’

‘घराबाहेर पडताना तुम्हाला ठराविक पोशाख करावा लागतो.काय घालायचं, काय नाही याची काळजी घ्यावी लागते.’ लुलियाचं हे म्हणणं सलमानच्या कुटुंबाला उद्देशून असल्याचं जाणवत होतं.

सलमान आणि लुलिया 18 नोव्हेंबरला लग्न करणार अशीही बातमी होती. पण दोन देशांच्या संस्कृतीचा मिलाफ काही होऊ शकला नाही एवढं खरं.आणि पुन्हा एकदा सल्लूमियाँ एकटाच राहिला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close