महापौरपदासाठी सागर नाईक निश्चित

May 5, 2010 2:21 PM0 commentsViews: 6

5 मे

नवी मुंबई महापालिकेच्या महापौरपदी कोण विराजमान होणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. आज नवी मुंबई महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरले गेले.

एक हाती सत्तेमुळे महापौर राष्ट्रवादीचाच असणार हे तर नक्की आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाईक कुंटुंबातीलच महापौर होणार हेही नक्की आहे. यावेळी गणेश नाईक यांचे पुतणे सागर नाईक यांचे नाव महापौरपदासाठी निश्चित झाल्याचे समजते.

तर उपमहापौरपदी गणेश नाईक यांचे निष्ठावंत भरत नखाते यांची वर्णी लागणार आहे.

तसेच महापालिकेच्या खजिन्याची चावी म्हणजेच स्थायी समितीच्या सभापतीपदी रमेश शिंदे आणि अनंत सुतार यांची नावे चर्चेत आहे. तर सभागृह नेतेपदी विठ्ठल मोरे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे.

close