भूकंपाच्या धक्‍क्‍याने जपान हादरले, त्सुनामीचा इशारा

November 22, 2016 8:39 AM0 commentsViews:

3_201611220732_940x355

22 नोव्हेंबर :  जपानच्या उत्तर किनाऱ्यावर आज पहाटे भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ७.३ रिक्टर स्केल एवढी होती. भूकंपानंतर उत्तर जपानच्या सर्व किनारी भागांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. तसंच सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. या भूकंपात अद्याप कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

आज पहाटे 5.51 मिनिटांनी भूकंपाचा हा धक्का बसला. राजधानी टोकियोपर्यंत जाणावलेल्या या भूकंपाचे केंद्र फुकूशीमा किनाऱ्या जवळच्या समुद्रात 10 किमी खोलीवर होते. त्यामुळे भूकंपानंतर टोहोकू कंपनीकडून फुकूशिमा येथे विजनिर्मिती करणाऱ्या अणुऊर्जा केंद्रावर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. भूकंपनानंतर लगेचच हवामान खात्याने ३ मीटरपर्यंतच्या त्सुनामीच्या लाटा किनाऱ्याला धडकण्याचा इशारा जारी केला असून स्थानिकांना सतर्क राहण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे जपानला पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागणार आहे.

दरम्यान, 2011 मध्ये आलेल्या त्सुनामीनंतर फुकुशिमा इथे अणुभट्टीचा स्फोट झाला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close