विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी मतमोजणी सुरू, काँग्रेस-राष्ट्रवादीत चुरस

November 22, 2016 9:39 AM0 commentsViews:

vidhan bhavan3

22नोव्हेंबर : विधान परिषदेच्या 6 जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे. त्यासोबतच लोकसभेच्या 4 आणि विधानसभेच्या 8 जागांच्या पोटनिवडणुकांचा निकालही आज लागणार आहे.

पुणे, सांगली-सातारा, जळगाव, नांदेड, यवतमाळ आणि गोदिया या सहा ठिकाणी विधान परिषदेसाठी 19 नोव्हेंबरला मतदान झाले होते. आज सकाळी ८ वाजता या जागांसाठीची मतमोजणी सुरु होईल आणि त्यानंतर थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल.

विधान परिषदेच्या 6 जागांसाठी 30 उमेदवार रिंगणात आहेत. सध्या 4 मतदारसंघात राष्ट्रवादी तर प्रत्येकी एका मतदारसंघांत काँग्रेस आणि भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी संघर्षाचा फायदा शिवसेना, भाजपला होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. परंतु मुख्य सामना काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असाच रंगणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close