नाशिक, शहाद्यात गारपीट

May 5, 2010 2:33 PM0 commentsViews: 6

5 मे

नाशिक आणि शहाद्यामध्ये झालेल्या जोरदार गारपिटीमुळे कांदा आणि केळीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

शहादा तालुक्यात वादळी वार्‍यासह झालेल्या गारपिटीमुळे केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचा हा आकडा 1 कोटींच्या घरात जाण्याची भीती आहे. या वादळात 200 एकर बागा भुईसपाट झाल्या आहेत.

तर नाशिकमध्ये उन्हाळी कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. तब्बल दिडशे एकरवरील कांद्याला या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

मनमाडसह येवला आणि उमराणा इथे कांद्याची बाजारपेठ आहे. गेले तीन दिवस माथाडी कामगारांचा संप आणि अवकाळी पावसामुळे कांद्याचे झालेले नुकसान यामुळे सर्वसामान्य लोकांना कांदा रडवणार अशीच चिन्हे दिसत आहेत.

close