विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची बरोबरी, राष्ट्रवादीचं संख्याबळ घटलं

November 22, 2016 12:48 PM0 commentsViews:

Vidhjan parishad banner
22 नोव्हेंबर: विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. विधान परिषदेच्या 6 जागांपैकी काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आणि भाजपलाही 2 जागा मिळाल्या.  एक जागा राष्ट्रवादीला मिळाली तर एक जागा शिवसेनेला मिळाली.

पुणे –  पुणे मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे अनिल भोसले विजयी झालेत.

सातारा-सांगली  – या मतदारसंघात काँग्रेसचे मोहनराव कदम यांनी बाजी मारली.
राष्ट्रवादीला इथे पराभवाचा धक्का बसला.

नांदेड – काँग्रेसचे उमेदवार अमर राजुरकर यांनी 251 मतांनी विजय मिळवलाय.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिष्ठा कायम ठेवलीय.

यवतमाळ –  शिवसेनेचे तानाजी सावंत यवतमाळ मतदारसंघात विजयी झालेत.
इथे राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला.

 भंडारा-गोंदिया –  भाजपचे परिणय फुके विजयी झाले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना हा मोठा धक्का आहे.

 जळगाव –   भाजपचे चंदूलाल पटेल विजयी झालेत.

पुणे विधान परिषद : अनिल भोसले – राष्ट्रवादी – 396 मतांनी विजयी

अनिल भोसले – राष्ट्रवादी – 440 मतं
संजय जगताप – काँग्रेस – 71 मतं
अशोक येनपुरे – भाजप – 133 मतं
विलास लांडे – काँग्रेस बंडखोर – 2 मतं

यवतमाळ विधान परिषद : तानाजी सावंत – युती – 270 मतांनी विजयी

नाजी सावंत – युती – 348 मतं
शंकर बढे – काँग्रेस – 78 मतं
संदीप बाजोरीया – अपक्ष – 2 मतं
5 मतं बाद

सांगली-सातारा विधान परिषद : मोहनराव कदम – काँग्रेस- 64 मतांनी विजयी

मोहनराव कदम – काँग्रेस – 309 मतं
शेखर गोरे – राष्ट्रवादी – 246 मतं
शेखर माने – अपक्ष – 2 मतं
मोहनराव गु. कदम – अपक्ष – 1 मत
10 मतं बाद

नांदेड विधान परिषद : अमर राजुरकर- काँग्रेस- 43 मतांनी विजयी

अमर राजुरकर – काँग्रेस – 251 मतं
श्याम सुंदर शिंदे – अपक्ष – 208 मतं
बाद 12 मतं

गोंदिया-भंडारा विधान परिषद : परिणय फुके – भाजप- 82 मतांनी विजयी

परिणय फुके – भाजप – 219 मतं
राजेंद्र जैन – राष्ट्रवादी – 137 मतं
प्रफुल्ल अग्रवाल – काँग्रेस – 112 मतं

जळगाव विधान परिषद : चंदूलाल पटेल – भाजप- 331 मतांनी विजयी

चंदूलाल पटेल – भाजप – 421 मतं
विजय भास्कर पाटील – अपक्ष- 90 मतं
शेख अखलाक – अपक्ष – 1 मत
नोटा – 1
बाद – 34 मत


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close