काश्मीरमधल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 2000च्या नव्या नोटा

November 22, 2016 4:13 PM0 commentsViews:

2000 NOETE

22 नोव्हेंबर : जम्मू-काश्मीरमधील बांदीपुरा येथे आज चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलेत तर परिसरात आणखी दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे. जवानांनी शोधमोहीम तीव्र केली आहे.

 सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर काश्मीरमधील बांदीपुरामध्ये मंगळवारी सकाळी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात 2 दहशतवादी ठार झाले आहेत. दरम्यान सध्या चकमक संपली आहे. मात्र, जवानांकडून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. लष्कराला मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात आणखी दोन दहशतवादी दडून बसले आहेत. त्यामुळे जवानांनी शोधमोहीम आणखी तीव्र केली आहे.

दरम्यान, जवानांनी दहशतवाद्यांकडील मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून, त्यांच्याकडे 2000 रुपयाच्या नवीन नोटाही सापडल्या आहेत. एकीकडे देशात अनेकांना अद्याप नव्या नोटा पहायलाही मिळालेल्या नसताना, नव्या 2 हजारच्या नोटा आतंकवाद्यांकडे सापडल्याने सगळेच जण पुरते चक्रावून गेलेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close