रजनीकांतला भेटायला सलमानची हजेरी

November 22, 2016 3:59 PM0 commentsViews:

salman_GE_22112016

22नोव्हेंबर: नुकताच मुंबईत सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या आगामी तामिळ सिनेमा 2.0 चित्रपटाचा फर्स्ट लूक लॉँच केला.आणि या सोहळ्याला हजर होता एक बिन बुलाए मेहमान-सलमान खान. सलमान खान खास रजनीकांतला भेटायला आला होता.

सलमाननं कार्यक्रमात रजनीकांतला गुरू म्हणून हाक मारली. त्यानं तिथं उपस्थित असलेल्या करण जोहरला ‘2.0’सारखे सिनेमे का नाही बनवत म्हणून विचारलं. सलमान खास भेटायला आला म्हणून रजनीकांतनं त्याला शुभेच्छा दिल्या. वर असंही म्हटलं की सलमान तयार असेल तर मी त्याच्यासोबत काम करेन.

तामिळ ब्लॉकबस्टर सिनेमा ‘इंथिरन’चा ‘2.0’ हा पुढचा भाग. सिनेमात अक्षय कुमार शास्त्रज्ञाच्या भूमिकेत आहे. सिनेमाचं बजेट आहे 350कोटी रुपये. या दिवाळीत हा सिनेमा रिलीज होणारेय. सिनेमाचं पोस्टर रिलीज झालंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close