माथाडी कामगारांचे आंदोलन मागे

May 5, 2010 3:06 PM0 commentsViews: 1

5 मे

नाशिक जिल्ह्यातील माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन मागे घेतले आहे. सरकारने कायदेशीर मार्गाने लेव्ही वसूल करून द्यावी, या अटीवर हे आंदोलन थांबवण्यात आले.

पणन संचालकांच्या उपस्थितीत व्यापारी, माथाडी आणि बाजार समित्यांचे पदाधिकारी यांच्यात तडजोड बैठक झाली. मात्र व्यापार्‍यांनी तडजोडीला नकार देत कायदेशीर मार्गाने जाण्याचे ठरवले.

लेव्ही वसुलीआधी माथाडी कामगारांचा मालक कोण, हे निश्चित करावे अशी व्यापार्‍यांची भूमिका आहे.

close