विद्या बालननं दिला ‘हम पांच’ला उजाळा

November 22, 2016 6:18 PM0 commentsViews:

22नोव्हेंबर: ‘हम पांच’ या विनोदी मालिकेनं एकेकाळी हंगामा केला होता. आणि या हिट मालिकेत होती विद्या बालन. विद्यानं पुन्हा एकदा या मालिकेत काम करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

विद्या बालनच्या करियरची सुरुवात ‘हम पांच’नं झाली. झी टीव्हीला 25 वर्ष झाल्याच्या निमित्तानं झीनं जुन्या मालिकांवर एक शो बनवलाय. त्यातलाच एक भाग म्हणजे ‘हम पांच’ मालिका.

मालिकेतली विद्याची आई शोमा आनंद,बहीण भैरवी रायचुरा आणि वंदना पाठक यांच्यासोबत विद्याचं वेगळं बाँडिंग आहे.या स्पेशल भागात विद्यानं खूप धमाल केलीय.झी टीव्हीवर हा खास एपिसोड 27 नोव्हेंबरला दाखवणार आहेत.

विद्या बालन सध्या ‘कहानी 2’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्यातून तिनं ‘हम पांच’साठी वेळ काढला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close