पुण्यात ‘असाही एक महाराष्ट्र’

May 5, 2010 3:12 PM0 commentsViews: 1

5 मे

महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रसिद्ध फोटोग्राफर संदेश भंडारे यांचे 'असाही एक महाराष्ट्र ' हे प्रदर्शन पुण्यात सुरू आहे.

पुण्याच्या बालगंधर्व कला दालनात सुरू असलेल्या या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळया भागातील व्यक्तिमत्वांचे फोटो आहेत.

महाराष्ट्रातील शहर आणि महानगरांच्या विकासापासून दूर असणारी ही माणसेदेखील महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्या आयुष्यभराच्या श्रमातून, जगण्यातून महाराष्ट्राचे खरे वैभव साकार झाले आहे, अशी या प्रदर्शनाची संकल्पना आहे.

माणसांच्या वेगवेगळया छटा संदेश भंडारेंनी लेन्समधून टिपल्या आहेत. पुण्यानंतर हे फोटो प्रदर्शन नाशिक, कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबाद इथेही भरवले जाणार आहे.

close