नोटबंदीच्या मुद्द्यावर ‘नरेंद्र मोदी ॲप’वर द्या मत

November 22, 2016 7:44 PM0 commentsViews:

narendra-modi-app-7591 new

22 नोव्हेंबर : नोटाबंदीच्या मुद्द्यावर देशभरात चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबद्दल जनतेकडून प्रतिक्रिया मागवलीय. ‘नरेंद्र मोदी’ या ॲपवर यासाठी एक पर्याय तयार करण्यात आलाय. नोटाबंदीवर अभिप्राय जाणून घेण्यासाठी तिथे काही प्रश्न दिलेत.हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो ? तुमची गैरसोय झाली का ? अशा स्वरूपाचे हे प्रश्न आहेत. हे प्रश्न इंग्रजी आणि हिंदीत आहेत.

नोटबंदीमुळे होणाऱ्या गैरसोयीवरून अनेक स्तरांतून टीका होतेय. संसदेतही याचे तीव्र पडसाद उमटतायत. याबदद्ल जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी या ॲपची मदत घेतली जातेय.  नागरिकांनी या ॲपवर या निर्णयाला पाठिंबा दिला तर मोदी सरकारला त्याची मदत होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close