काश्मीरमध्ये 3 जवान शहीद, एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना

November 22, 2016 9:55 PM0 commentsViews:

LOCAttack

22 नोव्हेंबर: काश्मीरमध्ये आज नियंत्रण रेषेवर 3 जवान शहीद झाले.  माच्छील सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात हे जवान मृत्युमुखी पडले.

संतापजनक बाब म्हणजे पाकिस्तानी सैनिकांनी एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना केलीय. 29 ऑक्टोबरलाही पाकने असंच भ्याड कृत्य केलं होतं. या भ्याड कृत्याचं चोख उत्तर दिलं जाईल, असा इशारा भारतीय लष्कराने दिलाय.

उरी हल्ल्यापासून नियंत्रण रेषेवर सतत गोळीबार सुरू आहे. जवान शहीद झाल्याची घटना आणि त्यावरची प्रतिक्रिया
लष्करानं ट्विट करून देशाला कळवली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close