देशातली 91 हजार एटीएम सुरू

November 23, 2016 10:50 AM0 commentsViews:

atm_625x300_71415526128

23 नोव्हेंबर: नोटाबंदीमुळे त्रस्त झालेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी सरकार आणि आरबीआयनं काही उपाययोजना केल्यात. जिल्हा बँकांना शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्याची परवानगी देण्यात आलीये. मात्र जिल्हा बँकांना हजार पाचशेच्या नोटा स्वीकारण्यावरील निर्बंध कायम ठेवलेत.

तसंच ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना सर्व्हिस टॅक्स माफ करण्यात येणार आहे.आता पेट्रोलपंपापाठोपाठ बिग बझारमध्येही डेबिट कार्डाच्या सहाय्यानं दोन हजार रुपये काढता येणार आहे.

देशातल्या 2 लाखांपैकी 91 हजार एटीएममध्ये पैसे टाकले असून या एटीएममधून पैसे काढण्यास सुरुवात झाल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close